निगडी ः पती छळ करत असल्याची तक्रार पोलिसात केल्याच्या रागातून पतीने पत्नीला लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले आणि शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सेक्टर क्र. 25, सिंधुनगर, प्लॉट क्र. 982, एलआयजी कॉलनी, निगडी प्राधिकरण येथे घडली. याप्रकरणी पीडित 36 वर्षीय महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती खालिद मोहीद्दीन इनामदार (वय 40) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पीडित महिलेने पती खालिद हा आपला छळ करत असल्याची तक्रार पोलिसात केली होती. या रागातून बुधवार (दि.24) सकाळी साडेसहाच्या सुमारास खालिदने लाकडी दांडक्याने पत्नीला अमानुष मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी खालिद याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिस उपनिरीक्षक एस.एस.घाडगे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − 14 =