चौफेर न्यूज – चक्क पोलिस आयुक्तांनी विद्यार्थ्याला ठोकलेला सॅल्यूट सध्या कर्नाटकात इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. बंगळूर शहरातील विट्टल मल्ल्या हॉस्पिटलबाहेर हा क्षण कॅमेरात कैद करण्यात आला होता. बंगळूर शहर पोलिसांनी शुक्रवारी आपल्या फेसबुक पेजवर ही चित्रफीत शेअर केली होती. “एका गणवेषाने दुसऱ्या गणवेषाला दिलेल्या सलामीतून शिस्तीचे मूल्य कळते,” असे या छायाचित्रासोबत कॅप्शन दिली होती. तेव्हापासून त्याला 1600 शेअर आणि 92000 व्ह्यू मिळाले आहेत.

शहरातील सेंट जोसेफ्स इंडियन स्कूलचा एक विद्यार्थी पोलिस आयुक्तांना आदर दाखविण्यासाठी सॅल्यूट करताना या चित्रफीतीत दिसतो. मात्र आश्चर्य म्हणजे आयुक्त टी. सुनील कुमार यांनीही आपल्या जागी थांबून त्या विद्यार्थाला सॅल्यूट केला. “तुम्ही महान अधिकारी आहात. तुम्ही एका प्रतिष्ठेच्या पदावर असूनही एका नागरिकाला तुम्ही केलेल्या सलामामुळे मी अवाक् झालो. तुम्हाला सलाम, सर,” असे एका वापरकर्त्याने लिहिले आहे. “आम्हाला शहरात जे पाहायचे आहे ते हेच आहे. ते म्हणजे एकमेकांबद्दलचा आदर,” असे दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seven + fourteen =