चौफेर न्यूज –  सध्याच्या रणरणत्या उन्हाळ्याच्या झळा अंगावर घेत वाहतूक पोलीस आपली कर्तव्ये पार पाडत आहे. वाहतुकीचे नियमन करत असतात. यामुळेच असोसिएशनने पोलिसांप्रती असलेल्या सामाजिक भावनेतून सावलीसाठी व पावसाळ्यात पावसापासून संरक्षण होण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील मुख्य चौकांमध्ये पोलीस फ्रेन्डस वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने मोठ्या आकाराच्या छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी  प्रदेशाध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, प्रदेश कार्याध्यक्ष गोपाल बिरारी, संपर्कप्रमुख हरिशआप्पा मोरे पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल गाडेकर, व्यापारी आघाडी अध्यक्ष भावेश दाणी, युवक अध्यक्ष युवराज चिंचवडे, शुभम चिंचवडे, रवी जाधव, दत्ता भोई, प्रमोद नेवे, स्वप्नील वाघेरे, ओमकार भोसले, बालाजी भोई, गणपत सत्वधर, सचिन भोई, शेखर परदेशी, आखिल नेवे आदी उपस्थित होते.

पिंपरी वाहतूक विभागाचे पोलिस आर.एस. निंबाळकर  निंबाळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सविता  भागवत, चिंचवड वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक संजीव पाटील यांनी असोसिएशनचे कार्य प्रेरणादाई आहे. त्यांनी पोलीसांसाठी छत्री वाटप हा छान उपक्रम राबविला आहे, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 − two =