साक्री  प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्री येथे वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विविध क्रीडा साहित्याचे पूजन आणि मशाल पेटवून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूलचे प्राचार्य अतुल देव, प्रमुख पाहुणे म्हणून साक्री क्रीडा संघटना अध्यक्ष संजय भामरे, तालुका क्रीडा संघटना सदस्य नितीन खैरनार, शाळेचे अध्यक्ष प्रशांत भिमराव पाटील, स्कूलचे व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय भामरे यांनी क्रीडा विषयी विद्यार्थ्यांना महत्व पटवून दिले. ते म्हणाले की, दैनंदिन जीवनात बालकांचा सर्वांगिण विकास होणे गरजेचे आहे. त्यात शारिरीक विकास म्हटला तर तो आरोग्याशी निगडीत आहे. चांगल्या शिक्षणासाठी चांगल्या आरोग्याची आवश्यकता असते. तो आरोग्य विद्यार्थ्यांना खेळातून प्राप्त होते. प्रत्येक खेळ हा नियमाने समजून घेवून खेळावा. आपल्याला ज्या खेळात रुची आहे. त्या खेळास अधिक प्राधान्य द्यावे. वेळोवेळी विद्यार्थ्यांची क्रीडा चाचणी घेवून त्यांचा ज्या खेळात कल जास्त त्यानुसार प्रोत्साहन देणे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इयत्ता ९ वी वर्गातील मृदुला काकुस्ते व वीणा कांकरीया यांनी केले. ग्राऊंड आखणी कुणाल देवरे, नितीन राजपूत यांनी केले. क्रीडा महोत्सवासाठी सुंदर रांगोळी रेखाटन सिमा मोरे, भाग्यश्री बेडसे, योगिता देसले यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.

कबड्डी खेळाने महोत्सवाची सुरुवात…

या क्रीडा महोत्सवाची सुरुवात कबड्डी खेळाने करण्यात आली. महोत्सवात फुटबॉल, संगित खुर्ची, झिकझॅक रेस, रेडी टू स्कूल, रनिंग, गोळा फेक, भाला फेक, बॉल – बकेट्, निडल ॲन्ड थ्रेड, म्युझिकल कॅप अशा अनेक खेळांचा समावेश होता. सर्व वर्गातील खेळाडूंनी महोत्सवात सहभाग घेवून रंगत आणली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 − eight =