चौफेर न्यूज – नोबेल पारितोषिक विजेते भारतरत्न सर सी.व्ही.रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी रामन इफेक्ट हा वैशिष्ट्यपूर्ण शोधनिबंध जगासमोर सादर केला. या दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. या निमीत्त प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक अतुल देव, संजय भामरे यांच्याहस्ते सरस्वती व डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या प्रसंगी इ. ७ वीतील लुब्धा देसले हिने डॉ. होमी भाभा यांच्या न्यूक्लिअर या शोधाविषयी माहिती दिली. शुभदा बच्छाव हिने चार्ल्स बॅबेज यांच्या कॉम्प्युटर या शोधाविषयी, अभिजीत पाटील याने न्युटन यांचा गुरुत्वाकर्षणाचा शोध गतिविषयक तीन नियम याविषयी माहिती व गायश्री देसले हिने अलेक्झेंडर बेल यांचा टेलिफोन शोध व ऋत्वीजा खैरनार हिने डॉ. सी.व्ही.रामन यांच्या रामन इफेक्ट शोधाविषयी माहिती दिली. तसेच, इ.६ वीतील सानिया शहा व भुमिका पाटील यांनी विविध उपकरणांचा वापर करून हवा जागा व्यापते, हवेला वस्तुमान असते, ज्वलनासाठी ऑक्सीजनची आवश्यकता असते, हे प्रयोगाद्वारे सिद्ध करून दाखविले. दरम्यान, इ.६वी तील विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयावर आधारित विविध प्रोजेक्ट सादर केले. या प्रसंगी, शाळेचे मुख्याध्यापक यांनी विज्ञानाचे महत्व विशद केले, विज्ञानामुळे मानवाने आपल्या इच्छा व आपले स्वप्न साकार केले आहे. विज्ञानामुळेच मनुष्याने अनेक ग्रहतारा याविषयी माहिती मिळविली. तसेच चंद्र, मंगळ ग्रहावर पोहचू शकतो. कमी वेळात हजारो एकर जमिनीची बीजारोपण, कापणी, मळणी विविध यंत्रांद्वारे करू शकतो. राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यामागचा उद्देश्य म्हणजे विज्ञानास प्रोत्साहन मिळावे, विज्ञानाशी संबंधित घडामोडींना वाव मिळावा तसेच त्याचा समाजासाठी उपयोग व्हावा, असे विशद केले. कार्यक्रमाचे संयोजन व सुत्रसंचालन महेश ठाकर यांनी केले. तसेच, रांगोळीचे रेखाटन सिमा मोरे व भाग्यश्री पाटील आणि भुपेंद्र साळुंखे यांनी फलक लेखन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद व इतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

14 − 3 =