साक्री – विद्यार्थ्यांमध्ये शारिरीक बळकटी व आरोग्यासाठी साक्री येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात योगासणाचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. प्राचार्य अतुल देव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

आजच्या स्पर्धात्मक जिवनात विद्यार्थी पालकांकडून शिक्षणावर भर दिला जात आहे. परंतु, विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून त्यांना लहानसहान आजारांना सामोरे जावे लागते. याची दखल घेत स्कूलच्या आवारात विविध प्रकारची योगासणे तसेच मल्लखांबचे प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केली. यावेळी, सर्वच विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह त्यांच्या आरोग्यासाठी स्कूलच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी प्राचार्य अतुल देव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × 4 =