चौफेर न्यूज – गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया… अशा जयघोषात गुरुवार दि. १३ गणेश चतुर्थी रोजी प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये वाजतगाजत गणपती बाप्पाचे स्वागत करण्यात आले. यावेळी, शाळेचे प्राचार्य अतुल देव, शाळेचे व्यवस्थापक तुषार देवरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ‘गणेश चतुर्थीच्या’ निमित्ताने शिक्षीकांनी सुंदर अशी रांगोळी रेखाटून सर्वांचे लक्ष केंद्रीत केले.

प्रसंगी, मान्यवरांच्या हस्ते मुर्तीचे पूजन करून स्थापना करण्यात आली. गणपती बाप्पाचे पूजन धर्मराज अहिरे यांच्या हस्ते झाले. मंदिराचे डेकोरेशन श्री. पवार, श्री. साळुंखे यांनी केले. मिरवणुक काढून वाजतगाजत बाप्पाच्या स्वागताचा कार्यक्रम पार पडला. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × 4 =