साक्री – प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये सोमवार दि. १७ रोजी “इंग्रजी भाषेत युजेस ऑफ सोशल मिडीया राईट ऑर राँग” या विषयावर वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. याप्रसंगी, प्रमुख पाहुणे म्हणून प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापक तुषार देवरे, प्राचार्य अतुल देव उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजनाने झाली. सदर कार्यक्रमात १८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धक विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयाचा वापर योग्य अथवा अयोग्य कशाप्रकारे आहे, यावर आपले मत सर्वांसमोर मांडले. सोशल मिडियाच्या वापरामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होते. तसेच, एकाच वेळेस हजारो लोकांपर्यंत संदेश पाठविता येतो. तर नकारात्मक बाजू मांडणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयाचा अतिरेक भावी पिढी उध्वस्त करण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले.

या प्रसंगी, शाळेचे प्राचार्य अतुल देव यांनी वादविवाद करणे हे कौशल्य असून ते विद्यार्थ्यांनी अंगीकारले पाहिजे, असे मत व्यक्त केले. वादविवाद स्पर्धेसाठी शाळेतील शिक्षक बेहरा, मोहन गावीत, योगेश जाधव यांनी परिक्षकांची भूमिका बजावली. कार्यक्रमाची रुपरेषा निलेश माळीचकर यांनी मांडली. सुत्रसंचालन मंगेश बेडसे यांनी केले. छायाचित्रण नितीन राजपूत यांनी टिपले. सदर कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 + five =