साक्री – येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या गणपती बाप्पाचे ढोल – ताशांच्या गजराज वाजत गाजत विसर्जन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी – शिक्षकांनी नृत्यांचे सादर करून बाप्पाला भावूक वातावरणात निरोप दिला. यावेळी, प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य अतुल देव, व्यवस्थापक तुषार देवरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा सामाजिक प्रबोधन हा वसा जपत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी गणेशमूर्ती तसेच विविध उपक्रम राबविण्यात आले.

प्रतिची इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रतिवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. पर्यावरणपूरक गणेशोत्सव हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. स्कूलतर्फे गणेशोत्सव काळात विविध स्पर्धा घेण्यात येतात. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी श्री गणेशाची पर्यावरणपूरक मूर्ती, रोज विद्यार्थ्यांच्या हस्ते सामुदायिक आरती, त्यानंतर लहान-थोरांसह सर्वांसाठी असलेली वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची पर्वणी आणि विविध उपक्रम या सर्व पार्श्वभूमीवर अकरा दिवस गणेशोत्सव साजरा झाला. शाळेचे प्राचार्य अतुल देव यांनी विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाचे महत्व पटवून दिले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी स्कूलच्या प्रांगणात विविध नृत्यविष्कार सादर केले. शिक्षीका स्मिता नेरकर, सीमा मोरे, भाग्यश्री बेडसे, स्वाती अहिरे, वैशाली पाटील, अनुष्का सोनवणे, यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर, परिसरातील नदीवर गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर… या जयघोषात मिरवणुक काढून भावूक वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

12 − 4 =