साक्री – प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवार दि. २८ रोजी ब्लु डे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूलचे प्राचार्य अतुल देव तर प्रमुख म्हणून व्यवस्थापक तुषार देवरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आकाशात बलुन सोडण्यात आले. इयत्ता १ ली ते ९ वी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी ब्लु रंगाचे कपडे परिधान करून सर्व परिसर निळामय झाला.

प्रसंगी, इ. १ ते ४ पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी ब्लू डे निमीत्त निळ्या रंगाचे प्रतिक असलेले ग्रिटींग कार्ड, कार्टून, निळे फुगे, टेडी तसेच शो – पीस तयार केल्याने सर्वांचा आनंद द्विगुणा झाला. यावेळी इ.१ ली तील समिक्षा पाटील, इ.२ री वर्गातील साईना शाह, इ. ४ थीतील शिव भालचंद्र पाटील, इ.५ वी – परिज्ञा भामरे, इ.६ वी – गुंजन शरद तोरवणे, इ.७ वी – सानिया अमिन शाह या सर्व विद्यार्थ्यांनी निळा रंगाचे महत्व तसेच निळ्या रंगावर आधारित कविता सादर केल्या. स्कूलच्या शिक्षीका वैष्णवी सोनवणे यांनी निळा रंग आपणास कुठे आढळतो, तसेच त्याचे महत्व सांगितले. त्याचप्रमाणे शाळेचे प्राचार्य अतुल देव यांनी निळा रंगाबाबत माहिती दिली. ब्लु डे चे नियोजन भाग्यश्री बेडसे यांनी केले. ब्लु रांगोळी रेखाटन सिमा मोरे, योगिता देसले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितीन राजपूत यांच्यासह सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सुत्रसंचालन इयत्ता ८ वी तील विद्यार्थी अभिजीत याने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − 10 =