साक्री –  येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये शनिवार दि. 29 रोजी कथा थन स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेत विद्यार्थ्यांनी कथा कथन केली. कार्यक्रमाची सुरवात प्राचार्य अतुल देव यांच्याहस्ते सरस्वती पूजनाने झाली.

स्पर्धेसाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या ३८ विद्यार्थ्यांनी हाऊसनुसार सहभाग नोंदविला. स्पर्धा चार हाऊसनुसार घेण्यात आली. या स्पर्धसाठी तीन गट तयार करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता १ ते ३, ४ ते ६, ७ ते ८ या गटानुसार झालेल्या स्पर्धेसाठी पर्यवेक्षक म्हणून स्मिता नेरकर, बेहरा, शिवाजी साबळे यांनी काम पाहिले.

स्कूलचे प्राचार्य अतुल देव यांनी मुलांचे कौतुक केले. ते म्हणाले, अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन, स्टेज डेअरिंग वाढते. त्याचा व्यक्तिमत्व विकास होतो. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.  स्पर्धेचे नियोजन नितु पंजाबी यांनी केले. सूत्रसंचालन इयत्ता 8 मधील विद्यार्थिनी मृणाल देव, सई पाटील यांनी केले. सुंदर फलक लेखन सीमा मोरे तर छायाचित्रे नितीन राजपूत यांनी टिपली. या स्पर्धेसाठी सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve − 3 =