साक्री :  येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवार दि. ०८ डिसेंबर २०१८ रोजी गोवर, रुबेला लसीकरणचे आयोजन करण्यात आले आहे. धुळे जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्त,  धुळे शहर यांच्या आवाहनानुसार सर्व गावांतील, वाडी, वस्ती, पाड्यांवरील नऊ ते पंधरा वर्षातील सर्व मुलांना मोफत लस देण्यात येणार आहे. हा केंद्र व राज्य शासनाचा उपक्रम असून २७ नोव्हेंबर रोजी या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. ही लस “9 महीने ते 15 वर्ष”पर्यंत च्या सर्व बालकांना देण्यात येणार असल्याने पालकांनी आपल्या पाल्यांना घेवून शाळेत उपस्थित राहावे, असे आवाहन शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

10 + nine =