साक्री – प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात मंगळवार दि. ११ रोजी तंबाखू मुक्त शाळेची प्रतिज्ञा घेण्यात आली. तत्पूर्वी शाळेचे प्राचार्य अतुल देव यांनी तंबाखु सेवनामुळे व्यक्तिला कॅन्सर सारख्या महाभयंकर रोगाला बळी पडावे लागते. कॅन्सर हा जीवघेणा आजार असून त्यामुळे आपण आपले व पारिवारीक जीवांचे भविष्य उध्वस्त करतो. त्याचवेळी तंबाखू मुक्त परिसर यावर प्रतिज्ञा घेण्यात आली.

आपल्या शाळेचा परिसर तंबाखू मुक्त व्हावा. यासाठी स्वाती अहिरे, श्री. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी घोषवाक्ये लावण्यात आली. शाळेतील इ. ११ वी १२ वीच्या विद्यार्थ्यांनी वैशाली पाटील यांच्या सहकार्याने तंबाखुमुळे होणारे दुष्पपरिणाम यावर आधारीत नाटीका सादर केले. नाटीकेद्वारे प्रत्यक्ष स्वरुपात तंबाखूचे दुष्पपरिणाम पटवून सांगीतले.  विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्त परिसर याविषयी आपल्या घरात व परीसरात जनजागृती कशी करावी, याविषयी मार्गदर्शन्‍ करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी सिमा मोरे, भुपेंद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तबाखू विरोधी अनेक चित्रे व लेख सर्वांसमोर सादर केले. याप्रसंगी, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × 2 =