साक्री – येथील प्रचिती इंटरनॅशरल स्कूलमध्ये पिंक डे साजरा करण्यात आला. यावेळी स्कूलचे प्राचार्य अतुल देव, व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे उपस्थित होते. यावेळी प्रचिती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गुलाबी रंगाचे ड्रेस परिधान करून आणले होते. विद्यार्थ्यांनी गुलाबी रंग दर्शवणारी चित्रे, ग्रिटींग कार्ड, फुगे, फुले अशा विविध वस्तू आणल्या होत्या. याप्रसंगी इयत्ता ८ वीमधील कुणाल भदाणे, लुब्धा देसले, इयत्ता ७ वी तील भुमिका पाटील, राधिका देवरे, इयत्ता ६ मधील निशांत देसले, इयत्ता ४ थीतील कुमुद भामरे, राजलक्ष्मी, रीतीका टाटीया, रसिका चाळसे या सर्व विद्यार्थ्यांनी गुलाबी रंगाविषयी माहिती व कविता सादर केल्या.

याप्रसंगी स्कूलचे प्राचार्य अतुल देव यांनी गुलाबी रंगाविषयी मार्गदर्शन केले, ते म्हणाले की, पिंक डे हा इंटरनॅशनल उपक्रम असून तो प्रथम २००७ साली युवा समाजसेवक डेविड शफर्ड याने ओटावा (कॅनड) येथे सुरु केला. लाल व सफेद रंगाच्या मिश्रणाने हा गुलाबी रंग तयार होतो. गुलाबी रंगामुळे आनंदमय वातावरण निर्माण होते. गुलाबी रंगामुळे स्फुर्ती येते. गुलाबी रंग शुभ मानला जातो. या रंगामुळे डोळ्यांना शांतता प्राप्त होते.

कार्यक्रमाचे संयोजन प्राजक्ता मॅडम व मनन बेग यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इयत्ता ८ वीतील गायश्री देसले, हर्ष खैरनार यांनी केले. गुलाबी रंग दर्शविणारे फलक लेखन भुपेंद्र साळुंखे यांनी केले. सुंदर रांगोळी रेखाटन सिमा मोरे, भाग्यश्री बेडसे यांनी केले. यावेळी कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × two =