चिमुकल्यांनी घेता येणार घोड सवारीचा आनंद; मिकी माऊस देखील वेधणार विशेष लक्ष

साक्री ः प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना व्यवहाराचे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवता यावेत, तसेच अध्ययन व अध्यापन प्रक्रीया सुलभ, मनोरंजनात्मक व्हावी, यासाठी साक्री येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्यूनिअर कॉलेज मध्ये धम्माल मस्ती अशा बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्कूलच्या आवारात रविवारी दि. 6 आणि सोमवार 7 जानेवारी 2019 रोजी बालआनंद मेळावा भरविण्यात येणार आले. प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या संकल्पनेने विद्यार्थ्यांच्या बौद्धीक व व्यवहारीक विकासासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

जादुगारांच्या जादुई प्रयोगाने विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले जाणार आहे. तसेच, आनंद मेळाव्यात विविध प्रकारचे स्टॉल लावण्रात येणार आहेत. रामध्रे पाणीपुरी, इडली, वडापाव, आईस्क्रीम, रसना, दाबेली, गुलाबजामून, अंडारोल, मुगभजी, मेदुवडा, भेळ, आप्पे, कचोरी असे विविध प्रकारचे स्टॉल मेळाव्याचे आकर्षक

ठरणार आहे. यासह महिला पालकांसाठी स्वीट डिश डेकोरेशन कॉम्पीटीशनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मोठ्या संख्येने महिला -पालक सहभाग घेतील अशी अपेक्षा शाळा व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

 

मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन

तसेच, चिमुकल्यांनी घोड सवारीचा आनंद घेता येणार आहे. चिमुकल्यांचे विशेष लक्ष वेधणाऱ्या मिकी माऊस देखील यावेळी सर्वांचे लक्ष वेधणार आहे. शिक्षणासोबत व्यवहार ज्ञान मिळण्रासाठी होत असलेल्या आनंद मेळाव्यात चिमुकल्यांसह पालकांनी देखील मनसोक्त आनंद लुटावा, तसेच, विद्यार्थ्यांनी जत्रेचा अनुभव घ्यावा, असे आवाहन शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.

 

पालकांसाठी पाककला स्पर्धा

दरम्यान, महिला पालकांसाठी पाककला स्पर्धा (तिळाचे लाडू), रांगोळी स्पर्धा (स्वच्छ भारत – स्वच्छता अभियान) व हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तर लहान वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, पारंपरिक वेशभूषा, प्राणी व पक्षी वेशभूषा आदी स्पर्धा घेण्यात येतील. आनंद बाजाराला आठवडे बाजाराचे स्वरूप निर्माण होईल, अशी आशा व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. मेळावा सर्वांसाठी खुला असून पालक व स्थानिक ग्रामस्थांनी खरेदीचा आनंद घ्यावा. त्याचप्रमाणे, विद्यार्थी व पालकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

विद्यार्थी जगणार स्वतःचा दिवस

मुलांमधील शारीरिक व मानसिक, भावनिक विकास होण्राच्रा उद्देशाने ‘बाल आनंद मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले. खर्‍या अर्थाने मुलांनी ‘स्वतः चा दिवस’ साजरा करणार आहेत. मुलांचे कौतुक करण्यासाठी देखील मेळाव्यात सक्रीय सहभाग घेणार आहे. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान वाढावे व भविष्यात विद्यार्थी वैज्ञानिक तयार व्हावेत, यासाठी शाळेत आनंद मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी शेतीमाल, पालेभाज्या, कडधान्य, किराणा दुकान, खाऊच्या स्टॉलचीच उभारणी करून वस्तूंची विक्री केली जाणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen − eleven =