प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, कॉलेजमध्ये ’ख्रिसमस नाताळ‘ सण उत्साहात

साक्री ः प्रतिनिधी

येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्यूनिअर कॉलेजमध्ये नाताळ सण नुकताच साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अतुल देव होते. यावेळी व्यवस्थापक तुषार देवरे, शैलेश गावित, राऊत पंत यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात येशुचे नामस्मरण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. स्कूलच्या शिक्षकांनी नाताळ सण निमित्ताने सुंदर रांगोळी काढली. तसेच उत्कृष्ट फलक लेखन करण्रात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मोहन गावीत तसेच इयत्ता 11 वीची विद्यार्थींनी जयंती जैन यांनी केले. येशु ख्रिस्थांच्रा जीवनावरील विविध प्रसंग विद्यार्थ्यांनी नाटिकेद्वारे सादर केली. प्रमुख पाहुण्यांनी येशूच्या जीवनातील प्रसंग, लोकांसाठी त्यांनी केलेले कार्य त्याचबरोबर

त्यांनी दिलेले संदेशाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाच्या दरम्यान,  सांताक्लॉज यांच्या आगमनाने विद्यार्थ्रांमधील उत्साह द्विगुणित झाला. सांताक्लॉजतर्फे केक कापून नाताळ सण साजरा झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. तसेच,

विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

10 + sixteen =