साक्री – डिजेचा आवाज, गणेश भक्तांचा सळसळता उत्साह, फुलांची उधळण, भगव्या पताका नाचवत, मंगलमूर्ती मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…. चा जयघोष प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज साक्री येथे बाप्पाचा विसर्जन सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला. भव्य दिव्य मिरवणुकीने लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

 दि.११ सप्टेंबर २०१९ बुधवार रोजी श्री गणेशाला निरोप देण्यात आला. यावेळी शाळेचे अध्यक्ष प्रशांत भीमराव पाटील, शाळेचे प्राचार्य अतुल देव, प्राचार्या भारती पंजाबी, शाळेचे व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व चालक मालक संघ बाप्पाच्या विसर्जनासाठी उपस्थित होते. दरम्यान, प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गणरायांना निरोप देण्यासाठी विद्यार्थ्यांनी गणेशाच्या विविध गितांवर ठेका धरला. तसेच शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्याहस्ते विसर्जन घाटावर गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − 10 =