चौफेर न्यूज – साक्री येथील प्रचिती प्रि-प्रायमरी, स्कूलच्या युकेजी वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पालक अविनाश मोहिते होते. शाळेचे चेअरमन प्रशांत पाटील, कैलास मोरे, संगीता मोरे, योगेंद्र सोनवणे, सोनाली सोनवणे, दिपाली प्रवीण अहिरराव, अविनाश मोहिते, मनिषा मोहिते, पन्नादेवी उत्पल नांद्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. तसेच, शाळेच्या प्राचार्य भारती पंजाबी व वैभव सोनवणे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नर्सरीपासून युकेजी पर्यंतचा तीन वर्षांचा सुखद अनुभव युकेजी वर्गातील गार्गी सोनवणे, समिक्षा देसले, सत्यजित देसले, पार्थ खैरनार या चिमुकल्यांनी आपल्या शब्दांत मांडला. विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी भारती पंजाबी व भारती पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, शाळेत १०० टक्के उपस्थित असलेले विद्यार्थी व त्यांचे पालक यांना प्रमाणपत्र व पदक देवून गौरविण्यात आले. यामध्ये, धनुश्री कैलास मोरे – नर्सरी, नयन योगेंद्र सोनवणे- युकेजी डायमंड, आराध्या प्रवीण अहिरराव – युकेजी गोल्ड, ऋतुराज अविनाश मोहिते – युकेजी लोटस, पेहल उत्पल नांद्रे – युकेजी रोझ या विद्यार्थ्यांसह युकेजीमधील दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना केजी पदवी प्रमाणपत्र व कॅप घालून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी आकर्षक रांगोळी वृषाली सोनवणे तसेच आकर्षक फलक लेखन सुनीता पाटील व प्रिती लाडे यांनी रेखाटले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व संयोजन स्नेहल पाटील यांनी केले. भारती पवार, श्वेता रौंदळ, वृषाली सोनवणे, सुनीता पाटील, प्रतिभा अहिरराव, स्नेहल पाटील, प्रिती लाडे, हिरल सोनवणे, शिक्षकेतर कर्मचारी बंदिश खैरनार, दिपक अहिरे, शांताराम पगारे, गणेश पगारे, प्रमोद खैरनार, महेंद्र पानपाटील, वैशाली भामरे, मंगल पवार, अनिता सोनवणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

                        

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two + thirteen =