चौफेर न्यूज – पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच, फलक लेखनातून विद्यार्थ्यांना नाताळाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या वैशाली लाडे होत्या. प्रसंगी, समन्वयक राहुल अहिरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दरम्यान, सांताच्या वेशभूषेत सिनियर केजीचा विद्यार्थी गीत विसपुते याने उत्साहात रंगत आणली. तसेच, केक कापून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होवून “जिंगल बेल ” या गीतावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. शिक्षिका अनिता पाटील यांनी नाताळ या सणाविषयी माहिती दिली. येशु ख्रिस्त यांचा जन्म दिवस हा नाताळ म्हणून साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ख्रिसमस ट्री कार्यक्रमाचा आकर्षणाचा भाग ठरला. समारोपाप्रसंगी, सांताच्या हस्ते मुलांना भेट वस्तू देण्यात आल्या. शिक्षिका अश्विनी पगार यांनी प्रास्ताविक केले. तसेच, ख्रिसमस…ख्रिसमस मेरी ख्रिसमस हे गीत विद्यार्थ्यांकडून म्हणुन घेतले.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eleven + 1 =