चौफेर न्यूज – साक्री येथील प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलमध्ये गुरुवारी रोजी विद्यार्थ्यांना शिक्षणातून रंगाची ओळख होण्यासाठी रंगपंचमी हा सण साजरा झाला. विद्यार्थ्यांनी विविध रंगांची उधळण करून आनंद लुटला. रंगपंचमी बरोबरच विद्यार्थ्यांना होळीचे देखील महत्व विषद करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी व व्यवस्थापक वैभव सोनवणे यांनी भूषविले. आकर्षक रांगोळी रेखाटणातून वृषाली सोनवणे व सुनीता पाटील यांनी सर्वांचे लक्ष वेधले. होळी व रंगपंचमी या सणांची माहिती भारती पवार यांनी समर्पक शब्दांत विद्यार्थ्यांना सांगितली. त्या म्हणाल्या, रंगपंचमी हा रंगाचा उत्सव एकमेकांवर रंग उधळून परस्परांमधील प्रेम हे वृद्धींगत करण्याचा दिवस आहे. या दिवशी वातावरणात सात्विक रंगांची उधळण करण्यात येते. या सात्विक रंगांच्या माध्यमातून रंग आणि गंध यांचे कण वातावरणात मिसळतात. त्यावेळी ते वातावरण कार्यरत झालेले ईश्वरी चैतन्य आकृष्ट करतात. होळी सणांची माहिती देतांना त्या म्हणाल्या, होळी संपूर्ण देशभरात उत्साहाचे साजरा केला जाणारा सण आहे. होळीला होळी पौर्णिमा असेही म्हणतात. तसेच त्यांनी या सणाविषयी चिमुकल्यांना गोष्टी सांगून त्याचे मनोरंजन केले. होळीच्या अग्नीमध्ये वाईट प्रवृत्तीचा नाश केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर सर्व चिमुकले व शिक्षक वृदांनी रंग उधळून रंगपंचमी हा सण जल्लोषात साजरा केला. शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली शिक्षीका भारती पवार, श्वेता रौंदळ, वृषाली सोनवणे, सुनिता पाटील, प्रिती लाडे, प्रतिभा अहिरराव, स्नेहल पाटील, हिरल सोनवणे, शिक्षकेतर कर्मचारी बंदिश खैरनार, दिपक अहिरे, महेंद्र पानपाटील, गणेश पगारे, शांताराम पगारे, वैशाली भामरे, मंगल पवार, अनिता पाटील यांच्या सहकार्याने कार्यक्रम घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eleven + 3 =