चौफेर न्यूज – साक्रीतील प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलमध्ये सोमवार दि. १ जुलै रोजी नवीन विद्यार्थी व पालकांचा स्वागत समारंभ कार्यक्रम जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालक हितेंद्र सोनवणे, क्रांती देसले होते. सर्व नवीन पालक व विद्यार्थ्यांना प्रचिती स्कूलमध्ये वर्षभरात घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.

प्रचितीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे वेगवेगळे महत्व आहे. त्याप्रमाणेच प्रचिरंग मधील नवीन विद्यार्थ्यांचा एक नृत्याविष्कार सादर करण्यात आला. तसेच, कार्यक्रमाचे अध्यक्ष जितेंद्र सोनवणे, क्रांती देसले यांनी आपल्याला आलेले सुखद अनुभव त्यांच्या शब्दात मांडले. त्यानंतर शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी यांनी सर्व नवीन पालकांना शाळेविषयी मार्गदर्शन केले. शाळेमध्ये राबविले जाणारे विविध उपक्रम, तसेच त्यांचे महत्व विशद करण्यात आले. दरम्यान, दहा – दहाचे ग्रूप करून नवीन पालक व विद्यार्थ्यांना फॅमिली ट्री देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच, पालकांच्या हस्ते शालेय आवारात वृक्षारोपण लावण्यात आले. या कार्यक्रमासाठी सुंदर असे फलक लेखन प्रिती लाडे, योगिता देसले यांनी केले. तसेच आकर्षक रांगोळी हिरल सोनवणे, मनिषा खैरनार यांनी रेखाटली. कार्यक्रमाचे संयोजन वृषाली सोनवणे तर सुत्रसंचालन स्नेहल पाटील, श्वेता सोनवणे यांनी केले.

शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षीका श्वेता सोनवणे, पुनम पवार, वृषाली सोनवणे, सुनीता पाटील, प्रिती लाडे, स्नेहल पाटील, हिरल सोनवणे, योगिता देसले, मनिषा खैरनार तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंदिश खैरनार, जयश्री नांद्रे, शांताराम पगारे, दत्ताभाऊ ठाकरे, दिपक अहिरे, प्रमोद खैरनार, महेंद्र पानपाटील, वैशाली भामरे, मंगल पवार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × one =