साक्री – येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये ब्लु डे निमीत्त सेव्ह ट्री अँड सेव्ह वॉटरचा संदेश देण्यात आला. शुक्रवारी दि. २८ रोजी हा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी होत्या.

ब्लु डे निमीत्ताने सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली होती. तसेच फलक लेखनातून निळ्या रंगाचे महत्व विषद करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात निळ्या रंगाचे महत्त्व शिक्षीका स्नेहल पाटील यांनी सांगितले. दरम्यान, निळा रंग धारण केलेल्या पृथ्वीचे रक्षण कशाप्रकारे करावे, हे नृत्याद्वारे मांडण्यात आले. त्यातून सेव्ह अर्थ, सेव्ह वॉटरचा संदेश देण्यात आला. निळ्या रंगाच्या पोशाखात उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत स्कूलच्या वतीने करण्यात आले. उपक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one + 11 =