साक्री – साक्री येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा झाला. दि. ०१ मार्च शुक्रवारी रोजी झालेल्या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे बाळू वामन पाटील हे होते. यावेळी, स्कूलच्या प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मशाल पेटवून खेळाला सुरुवात झाली. तत्पूर्वी, परेड संचलनाने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास घडून होत असून शरीरात ऊर्जा निर्माण होते. मन, बुद्धी व शरीर बळकट होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कवायत प्रकारानंतर क्रीडा प्रतिज्ञा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध रंगाचे ध्वज फटकावून संचलन केले. मानवी जीवनात खेळाचे महत्व आणि खेळाचे पाटील यांनी विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.

क्रीडा स्पर्धेमध्ये विविध खेळ घेण्यात आले. यामध्ये, नर्सरी – रनींग, पेपर बॉल बॅलन्स, कॅरट रॅबीट रेस.

एलकेजी – रनींग रेस, ॲबस्टॅकल रनींग रेस, स्टिक ब्लॅन्क आईज रेस.

युकेजी – लेमन स्पुन, शेप हॉप स्किप जम्प, सॅक रेस. हे खेळ रंगले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पूनम पवार यांनी केले. वार्षिक क्रीडा महोत्सव शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nine − 1 =