पिंपळनेर –

प्रचिती प्री-प्रायमरी स्कूल पिंपळनेरच्या वतीने आषाढी एकादशीनिमीत्त दिंडी महोत्सव दि. २ जुलै रोजी सामोडे गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच, विठ्ठलाची सुंदर प्रतिकात्मक रांगोळी रेखाटुन आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

णारे अलक लेखन करण्यात आले. पिंपळनेर नजीक सामोडे येथे विठ्ठल मंदिरात पालखीचे आयोजन करून मिरवणुक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी वारकरी वेषात व विद्यार्थीनींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेवून पालखी मिरवणुकीत सहभाग घेतला. दरम्यान, सामोडे येथील गावकऱ्यांनी व भजनी मंडळाने विद्यार्थ्यांच्या दिंडीत सहभाग घेतला. महिला मंडळांनी व शिक्षिकांनी अुगडी व अेर धरला. गावात पालखीत असणाऱ्या विठ्ठल रुख्मीनीची पूजा करण्यात आली. दिंडी संपन्न झाल्यानंतर भजनी मंडळ विद्यार्थी – विद्यार्थीनींना स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य वैशाली लाडे, समन्वयक राहुल अहिरे, वृषाली भदाणे, अर्चना देसले, निलिमा देसले, अश्विनी पगार, पूनम बिरारीस, तसेच शिक्षकेतर कर्मचारी माधुरी सैंदाणे, संगीता कोठावदे, जयेश घरटे आदींनी सहकार्य केले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen − 1 =