चौफेर न्यूज – विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच बौद्धिक, शारीरिक, भावनिक व सांस्कृतिक विकास व्हावा व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी साक्रीतील प्रचिती इंटरनॅशनल स्कुलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्रशांत पाटील होते. या कार्यक्रमात प्रचितीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, सुत्रसंचलन या कलांद्वारे उपस्थितांची मने जिंकली. तर मल्लखांब व दोर मल्लखांब हे खेळ खुपच चित्त थरारक ठरले. शिक्षक नितीन राजपूत यांनी हे प्रात्यक्षिक स्वत: व विद्यार्थ्यांकडून करवून घेतले. संस्कार राजगो-हे या विद्यार्थ्याने डोळ्यांवर पट्टी बांधून चलनी नोट ओळखणे, वृत्तपत्र, हस्तलिखीत वाचणे, अंक ओळखणे अशी कला सादर केली. या स्नेहसंमेलनात प्रचिती प्री प्रायमरी साक्री व प्रचिती इंटरनॅशनल स्कुलच्या शेकडो विद्यार्थ्यांनी अंगभूत कलांचे दर्शन घडवले. पिंपळनेर येथेही प्रचिती स्कुलमध्ये स्नेहमेळावा झाला.

यावेळी, कविता पाटील, वैशाली तोरवणे, प्रियंका देवरे, सविता बच्छाव, सुवर्णा बोरसे, सविता अहिरराव, आशा जैन, हर्षदा भामरे, विजया बोरसे, प्रचिती इंटरनॅशनल स्कुल साक्रीचे मुख्याध्यापक अतुल देव, व्यवस्थापक तुषार देवरे, प्री-प्रायमरी स्कुलच्या मुख्याध्यापिका भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे, प्रचिती स्कुल पिंपळनेरच्या मुख्याध्यापिका वैशाली लाडे, व्यवस्थापक राहुल अहिरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी प्रचितीमधील अस्तित्वात असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या गणित, विज्ञान, क्रीडांगण येथिल सुविधांबद्दल माहिती करून दिली. मुख्याध्यापक अतुल देव यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर करताना प्रचितीच्या विद्यार्थ्यांची शालेय क्रिडा स्पर्धेत जिल्हा व विभाग स्तरावर धडक तसेच तालुका विज्ञान प्रदर्शनात मारलेली बाजी याबद्दल माहीती दिली. सूत्रसंचालन मंगेश बेडसे व स्मिता नेरकर, निलेश माळीचकर, स्नेहल पाटिल, सुनिता पाटिल यांनी तर आभार भाग्यश्री बेडसे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रचिती इंटरनॅशनल स्कुल साक्री, प्रचिती प्री प्रायमरी स्कुल साक्री, प्रचिती प्री प्रायमरी स्कुल पिंपळनेरचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वाहन चालक वर्गाने परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 + 12 =