चौफेर न्यूज – साक्री येथील कान नदीपात्राचे लोकसहभागातून स्वच्छता व खोलीकरणाचे काम सुरु आहे. त्यासाठी शहरासह तालुक्यातील दात्यांकडून आर्थीक मदत होत असून, प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन प्रशांत पाटील यांनी वाढदिवसानिमीत्त एक दिवसाचा जेसीबी मशीनचा खर्च दिला आहे.

येथील कान नदीत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने तसेच अस्वच्छतेमुळे पात्र अतिशय अरुंद झाले आहे. यामुळे शहरातील काही तरुणांनी नदीपात्राचे लोकसहभागातून खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यांना तहसीलदार संदीप भोसले तसेच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील यांचे सहकार्य लाभले. लोकसहभागातून होणाऱ्या या कामास शहरासह तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यात पाचशे रुपयांपासून तर एक- दोन दिवसांच्या एका मशिनच्या खर्चाची मदत होत आहे. यासाठी पंकज मराठे, सचिन देसले, सुमीत नागरे, जितेंद्र मराठे, पाटील परिवार ग्रूप, लाडशाखीय वाणी समाज, ॲड. निलेश देसले, उमेश खैरनार, सर्व शासकीय अधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांकडून एक दिवसाचा जेसीबी मशिनचा खर्च मिळाला, तर आमदार डी.एस. अहिरे व शहरातील सर्व डॉक्टर व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून दोन दिवसांचा खर्च मिळाला.

 वाढदिवसानिमीत्त केली मदत –

प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमीत्त नदी खोलीकरणासाठी एक दिवसाचा जेसीबी मशिनचा खर्च दिला. तसेच, बाजार समितीचे सभापती पोपटराव सोनवणे यांच्या वाढदिवसानिमीत्त अनावश्यक खर्च टाळत काँग्रेसच्या पदाधिकारी तथा जिल्हा बँकेचे संचालक हर्षवर्धन दहिते, पंचायत समिती गटनेते उत्पल नांद्रे, अक्षय सोनवणे, हर्षल बिरारीस, प्रफ्फुल्ल नेरे, दिगंबर पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी दोन दिवसांच्या खर्चाची आर्थिक मदत दिली. तसेच, नदीपात्रातच उभयतांचा वाढदिवसही साजरा झाला. जिल्हा परिषदेचे सदस्य विलास बिरारीस, जितेंद्र मराठे, ह्षीकेश मराठे, नितीन साळुंखे, मुन्ना देवरे, सुभाष देसले, शिव बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल नांद्रे, भाजपचे राकेश दहिते, शैलेंद्रे आजगे, शिवसेना शहरप्रमुख बंडू गिते, धनराज चौधरी, अविनाश कुवर, चेतन बिरारीस, वाल्मीक वकारे, जयंत सोनवणे, धीरज निकम आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 + fourteen =