पिंपळनेर – येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूल पिंपळनेर येथे ‘प्रजासत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आर्मी हवालदार भास्कर दाभाडे होते. शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, समन्वयक राहुल आहिरे यावेळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी परेड संचलन करून मान्यवरांचे स्वागत केले. भारतमाता प्रतिमा पूजन करून ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर, वंदेमातरम्‌च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच, विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले.

प्रस्तावना वर्षा भामरे यांनी केली. त्यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. दरम्यान, मान्यवरांचा सत्कार राहुल आहिरे यांनी केला. त्यानंतर, विद्यार्थ्यांनी भाषणे झाली. राष्ट्रीय नेत्यांच्या भूमिका साकारलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. प्रजासत्ताक दिनाविषयी अनिता पाटील, समन्वयक राहुल आहिरे, प्राचार्य वैशाली लाडे यांनी माहिती दिली. तसेच, संविधान वाचन करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने करण्यात आली. आभार पुजा नेरकर यांनी मानले. त्यानंतर, शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

6 − two =