चौफेर न्यूज   भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाला त्यागाची आणि बलीदानाची पार्श्वभुमी आहे. स्वांतत्र्य प्राप्तीसाठी शहीदांनी आपले प्राण वेचले आहेत. त्या स्वांतत्र्याचे मोल जानुन प्रत्येक नागरिकाने आपआपल्या पातळीवर देशाच्या अस्मितेसाठी काम करावे असे अवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर राहुल जाधव यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

बुधवारी सकाळी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपमहापौर सचिन चिंचवडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अपक्ष आघाडी गटनेता कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, इ प्रभाग अध्यक्षा भीमाबाई फुगे, नगरसदस्य राजेंद्र गावडे, राजू मिसाळ, अमित गावडे, केशव घोळवे, राजेंद्र लांडगे, शैलेश मोरे, नगरसदस्या अपर्णा डोके, स्विकृत सदस्य ऍड. मोरेश्वर शेडगे, माऊली थोरात, बाबू नायर, अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रविण आष्टिकर, दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह शहर अभियंता आयुब खान पठाण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, मुख्य माहिती व तंञज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, स्मिता झगडे, आशा राऊत विजय खोराटे, चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, संदिप खोत, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, मकंरद निकम, जीवन गायकवाड, संजय घुबे, प्रशांत पाटील, प्रविण लडकत, प्रमोद ओंबासे, विशाल कांबळे, ज्ञानदेव जुंधारे, प्रविण घोडे, मुख्यउदयान अधिक्षक राजेंद्र साळुंखे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विलास वाबळे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, फर्स्ट महार रेजीमेंटचे प्रमुख प्रभाकर खराते यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × 4 =