चौफेर न्यूज – 
प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये संतुलित प्रमाणात प्रकर्षाने पाठवण्याची कला आहे. श्‍वासाद्वारे आत घेतलेला प्राणवायू फुफ्फुसाद्वारे रक्तामध्ये शोषून घेतला जातो आणि शरीरातील रक्ताभिसरण क्रियेद्वारे सर्व पेशींपर्यंत पाठवला जातो.

पेशींच्या हालचालीसाठी ऊर्जाशक्ती प्राणवायूद्वारे प्राप्त होत असते. यातून निर्माण होणारा कार्बन डायऑक्साईड वायू उच्छ्वासावाटे बाहेर टाकला जातो. पेशींची चैतन्यपूर्ण हालचाल प्राणवायूमुळेच शक्य होत असते. प्रत्येक पेशीचे शरीरातील विविध इंद्रियांमध्ये विशिष्ट कार्य निसर्गाने नेमून दिलेले असते. ते चांगले व्हावे, पेशी कार्यक्षम, निरोगी, चैतन्यपूर्ण राहाव्यात, यासाठी योग्य प्रमाणामध्ये प्राणवायू पोहचवणे हे प्राणायामाद्वारे साध्य होत असते.

प्राणायाम करत असताना मन सहज शांत अवस्थेकडे येते. मनातील विचार चक्रांचा वेग अगदी कमी होऊन जातो. श्‍वसनाचा वेगही खूपच कमी असतो. प्राणशक्तीद्वारा विश्‍वचैतन्यच शरीराच्या अणूरेणूतून संचरत असते. उत्साह वृद्धिंगत होत असतो आणि परमश्रेष्ठ असा आनंदमय अमृतानुभवाचा आस्वाद प्राप्त होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 + 13 =