चौफेर न्यूज – प्रचिती प्री- प्रायमरी स्कूल साक्री येथे नेहमीच नाविन्यपुर्ण उपक्रम राबविले जातात. त्याअनुषंगाने फळे तयार करण्याचा उपक्रम शुक्रवार दि. २७ रोजी राबविण्यात आला. शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना फळांची तसेच फळभाज्यांची ओळख व्हावी, म्हणून शाळेतील शिक्षीका यांच्या समवेत क्लेय पासून विविध प्रकारच्या वस्तु तसेच फळे बनविण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. एप्रिल महिन्याचा शाळेचा शेवटचा दिवस म्हणजेच २७ एप्रिल या दिवशी विद्यार्थ्यांना अभ्यासापासून मुक्त ठेवून विद्यार्थ्यांना अभ्यासापासून मुक्त ठेवून विद्यार्थ्यांना नविन गोष्टी शिकवाव्यात तसेच त्यांचे मनोरंजनात्मक अध्ययन व्हावे, या दृष्टीकोनातून हा नाविण्यपुर्ण उपक्रम शाळेत राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः क्लेय पासून सफरचंद, आंबा, सिताफळ, स्टॉबेरी, सुर्य अशा विविध वस्तु तयार केल्या. या उपक्रमामध्ये सर्व चिमुकल्यांनी उत्स्फुर्तपणे भाग घेतला. शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी व व्यवस्थापक वैभव सोनवणे, स्नेहल पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंदिश खैरनार, शांताराम पगारे, दिपक अहिरे, गणेश पगारे, प्रमोद खैरनार, महेंद्र पानपाटील, वैशाली भामरे, मंगल पवार, अनिता सोनवणे यांच्या उत्कृष्ट सहकार्याने उपक्रम पार पडला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 − 13 =