प्राधिकरणातील भाजपच्या उमेदवारांची मतदारांशी ‘चाय पे चर्चा’
पिंपरी (दि. 13 फेब्रुवारी 2017) : निवडणूक प्रचारासाठी उमेदवार वेगवेगळे फंडे वापरुन मतदारांपर्यंत पोहोण्याचा प्रयत्न करत आहेत.  प्राधिकरण सेक्टर क्र. 27 मधील भाजपचे उमेदवार धनंजय काळभोर, अरुण थोरात, शर्मिला बाबर, शैलजा मोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे लोकप्रिय झालेल्या ‘चाय पे चर्चा’ चे अनुकरण करत संभाजी चौकात ज्येष्ठ नागरीकांशी संवाद साधला व त्यांचे आशीर्वाद घेतले. नरेंद्र मोदी यांच्या रुपाने एक चहावाला पंतप्रधान झाला म्हणून त्यांची भरपूर चर्चा झाली. चाय पे चर्चा उपक्रमही असाच प्रसिद्धीस आला. याच उपक्रमाचे अनुकरण प्राधिकरणातील भाजप उमेदवारांनी केले. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धनंजय काळभोर, अरुण थोरात, शर्मिला बाबर, शैलजा मोरे यांनी संभाजी चौकातील स्नेह ब्रम्ह मंडळ ज्येष्ठ नागरीक संघाच्या कट्यावर चाय पे चर्चा चांगलीच रंगली. या वेळी मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब लांडगे, राजेंद्र कोरे, एस. बी. पाटील, ॲड. अशोक वाघ, ॲड. बापूसाहेब थोरात आणि संत तुकाराम उद्यानात डॉ. गुणवंत चिखलीकर, डॉ. दिगंबर इंगोलो, डॉ. पुष्पा भंडारी, विश्वनाथ कोळेकर, ज्योती इंगवले, ज्ञानेश्वर शिंदे, बाळासाहेब साळुंके आदी उपस्थित होते.
स्वच्छ प्रतिमा असणारे भाजपचे उमेदवार माजी नगरसेवक धनंजय काळभोर हे उच्चशिक्षित, अनुभवी व अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांचे वडील ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक विठ्ठल काळभोर यांचा पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात खूप वर्षांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तसेच प्राधिकरण व आकुर्डी गावठाण परिसरात मागील अनेक वर्षांपासून काळभोर कुटुंबियांनी माऊली ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवून ज्येष्ठांची सेवा केली आहे. संघाचे अध्यक्ष मोहन कर्जूले यांनी सांगितले की, भाजपच्या वतीने रिंगणात असलेले उमेदवार एखाद्या पुष्पगुच्छाप्रमाणे एका पॅनेलमध्ये ख-या अर्थाने शोभून दिसतात. ज्येष्ठांच्या आशीर्वादाने भाजपाचा हा पूर्ण पॅनेल निवडून येईल, असा विश्वास अध्यक्ष बाबासाहेब लांडगे यांनी ‘चाय पे चर्चेत’ व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

8 − 3 =