पिंपरी : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे यांना नुकताच दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरचा राष्ट्रीय स्तरावरील ‘एचझङजध-इखङखढध एछणछउख-ढजठ ेष खपवळर 2016’ हा पुरस्कार देण्यात आला.
कलकत्ता येथील रामकृष्ण मिशन विवेकानंद विद्यापीठाचे कुलगुरू स्वामी आत्मप्रियानंदजी यांच्या हस्ते ‘एज्यु इंडिया 2016’ या कॉन्फरन्समध्ये दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. शितलकुमार रवंदळे यांनी आजपर्यंत पीसीईटीच्या कॅम्पस सिलेक्शन व रोजगार मेळाव्याअंतर्गत सुमारे 16 हजार 500 विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून दिली आहे. दरवर्षी सुमारे 150 कंपन्यांचे नोकर भरती मेळावे ते संस्थेत आयोजित करत असतात. ठश ढहळपज्ञ खपवळर या संस्थेमार्फत देशभरातील निवडक लोकांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
प्रा. रवंदळे हे पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पीसीसीओई, निगडी व पीसीसीओईआर, रावेत या दोन्ही अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संयुक्त सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता म्हणून गेल्या 12 वर्षापासून कार्यरत आहेत. या गौरवाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार एस.डी. गराडे, विश्‍वस्त भाईजान काझी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी रवंदळे यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

6 + fifteen =