उपमहापौर शैलेजा मोरे यांच्या पुढाकारातून प्रभाग १५ मध्ये उपक्रमाचे आयोजन

चौफेर न्यूजउन्हाळ्यातील मनोरंजनाचा थंडावा फुल टू धमाल २०१८ या मनोरंजनात्मक कार्यक्रमात नागरिकांनी भरपूर खरेदीसह, विविध खाद्यांचा आस्वाद घेत मनसोक्त आनंद लुटला. निमीत्त होते ते अनुप मोरे सोशल स्पोटर्स फाऊंडेशन व दृष्टी कम्युनिकेशन्स्‌ यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित धमाल २०१८ या कार्यक्रमाचे.

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शैलेजाताई मोरे यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक १५ मधील महिलांच्या व्यावसायिक ज्ञानात वृद्धी व्हावी, तसेच त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

एकाच ठिकाणी, खास तुमच्यासाठी…. जे इथे आहे, ते कुठेच नसेल… चला तर मग, सुट्टीचा खरा आनंद लुटुया, कुटुंबाबरोबर धमाल मस्ती करुया… या घोष वाक्याखाली प्राधिकरणातील पाटीदार भवनात मंगळवार दि. १५ आणि बुधवार दि.१६ मे रोजी सायंकाळी ४ ते १० वाजेच्या सुमारास कार्यक्रम घेण्यात आला.

खाद्य महोत्सव, भरपूर खरेदी, मनोरंजन असा उपक्रमातून महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन, पंजाबी, सरबते, सुंदर ड्रेसेस, साड्या, आकर्षक भेटवस्तू, मुलांसाठी खेळणी, कपडे, शोभेच्या वस्तू, सौंदर्य / प्रसाधने, आणि हो, खास बच्चे कंपनीसाठी मनोरंजनाचे विविध गेम्स्‌ आदी कार्यक्रम धमाल २०१८ मध्ये पार पडले.

यासह विशेष आकर्षण म्हणून महिलांसाठी पाककला स्पर्धा व विविध गुणदर्शन स्पर्धा, मुलांसाठी खास डान्स व फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या. या धमाल कार्यक्रम जवळपास दोनशे च्यावर महिलांनी स्टॉल लावले होते. यात विविध खाद्य पदार्थ, शोभेच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधने आदी विक्रीसाठी ठेवण्यात आल्याने नागरिकांनी खरेदीचा चांगलाच आनंद लुटला.

यासह विविध मराठी हिंदी गितांवर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी धमालमध्ये चांगलीच रंगत आणली. कार्यक्रम संयोजनासाठी अनुप मोरे, शर्मिला महाजन, ज्योती कानेटकर, राधिका बोलींकर, प्रतिक्षा मिरजी, माधुरी ओक, श्रद्धा कापडे, कल्याणी रेळेकर यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 − eleven =