चौफेर न्यूज फ्रान्स येथील औद्योगिक शिष्टमंडळाने पिंपरी चिंचवड शहराच्या औद्योगिक क्षेत्राशी संबंधित तसेच स्मार्ट सिटी संदर्भात तांत्रिक क्षेत्रात मदत करणेसाठी व विविध माहितीची देवाणघेवाण होणेकरीता महापालिकेस भेट देऊन माहिती घेतली. महापौर नितिन काळजे यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले.

यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, शहर सुधारणा समिती सभापती सिमा चौघुले, नगरसदस्या सुजाता पालांडे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सल्लागार मंत्री आणि दक्षिण आशिया प्रादेशिक सेवेचे प्रमुख फ्रान्सचे दुत जीन-मार्क फेनेट, फ्रान्सचे आर्थिक सल्लागार जीन-मार्क मिग्नोन, सल्लागार बाह्य संबंध आणि कायदेशीर बाबी, प्रादेशिक आर्थिक सेवा, फ्रान्समधील दुतावास इलिका खन्ना-मन्न आदी उपस्थित होते.

या शिष्टमंडळास Ernst & Young या सल्लागार संस्थेचे प्रतिनिधी यांनी PAN City बाबत विस्तृत सादरीकरण केले. KPMG या सल्लागार संस्थेने Area Based Development चे सादरीकरण केले. तसेच Palladium India यांनी City Transformation व City Branding बाबत शिष्टमंडळास सादरीकरण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

six + two =