चौफेर न्यूज – भारताच्या रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे नाव बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी शर्यतीत असून भारतीय वंशाच्या ब्रिटनच्या माजी व्यापारमंत्री सृष्टी वडेरा याही या पदाच्या दावेदार मानल्या जात आहेत. जगातील नामवंत अर्थतज्ञ म्हणून रघुराम राजन याची ओळख आहेच पण आंतरराष्ट्रीय अर्थशस्त्र आणि केंद्रीय बँकिंगचा त्यांचा अनुभव मोठा आहे असे इंग्लंडच्या फायनान्स टाईम्सने म्हटले आहे.

सध्या बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी कॅनडाचे मार्क कार्ने हे २०१३ पासून काम पाहत असून ते जून २०१९ मध्ये निवृत्त होणार आहेत. त्याच्या वारसदाराचा शोध सुरु असल्याचे बँकेने जाहीर केले असून पुढचा गव्हर्नर विदेशीही असू शकेल असे संकेत दिले आहेत. ३० शतकांच्या कारकिर्दीत बँकेने कार्ने याची गैरब्रिटीश गव्हर्नर म्हणून प्रथमच नियुक्ती केली होती. रघुराम याचा अनुभव आणि ज्ञान बँकेसाठी फार फायद्याचा ठरू शकेल असे मत जाणकार व्यक्त करत आहेत. अर्थात राजन यांनी या पदासाठी उत्सुकता दाखविलेली नाही असेही सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 + fourteen =