चौफेर न्यूज – फळ विक्रेत्याला 500 रूपयांची बनावट नोट देणाऱ्या दोघांना भोसरी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून 500 रूपयांच्या सहा नोटा जप्त करण्यात आल्या.

नीलेश विजय बनसोडे (वय-26) आणि अजय दयानंद शिरसल्ले (वय-21, दोघे रा. हडपसर) अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई रविंद्र जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

भोसरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी याबाबत माहिती दिली. दापोडी येथे पुणे – मुंबई महामार्गाच्या बाजूला जवाहर कमलाकर जाधव यांची फळ विक्रीची हातगाडी आहे. 10 सप्टेंबर रोजी आरोपी त्यांच्याकडे फळे घेण्याच्या बहाण्याने आले. फळे खरेदी केल्यावर त्यांनी 500 रूपयांची नोट जाधव यांना दिली. मात्र, नोट हातात घेताच जाधव यांना नोट बनावट असल्याचा संशय आला. त्यांनी त्वरीत आरोपींना हटकले असता ते पळून जाऊ लागले. मात्र, त्यांना पकडून भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्याकडे 500 रूपयेच्या तीन हजार रूपये किमतींच्या सहा बनावट नोटा आढळून आल्या. सहायक पोलीस निरीक्षक गणेश खारगे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × five =