चौफेरन्यूज – बिहारमधील मुलींच्या वसतीगृहातील बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने गुरुवारी माध्यमांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले. माध्यमांनी बलात्कार पीडित लहान मुलांचे छायाचित्र दाखवू नये, तसेच चेहरा ब्लर केलेले किंवा मॉर्फ केलेले छायाचित्रदेखील वापरु नये, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

बिहारमधील मुझफ्फरपूर येथील मुलींच्या वसतीगृहात लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जवळपास ३० मुलींवर बलात्कार करण्यात आला असून या घटनेने बिहारमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी बिहार बंदची हाक देण्यात आली असून सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणाची स्वत:हून गुरुवारी दखल घेतली. सुप्रीम कोर्टाने बिहार सरकार, महिला व बालकल्याण मंत्रालयाला नोटीस बजावली आहे. बिहार सरकारने यासंदर्भात तपास अहवाल कोर्टात सादर करावा, असे कोर्टाने सांगितले.

सुप्रीम कोर्टाने वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांनाही निर्देश दिले आहेत. बलात्कार पीडित लहान मुलांचे छायाचित्र (मॉर्फ केलेले आणि चेहरा ब्लर केलेले सुद्धा) वापरु नये, असे कोर्टाने सांगितले. तसंच त्यांची मुलाखतही घेऊ नये, असेही कोर्टाने स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × 1 =