चौफेर न्यूज – पोटच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर गुन्हेगाराला अद्दल घडवण्याऐवजी आरोपीकडून पैसे घेऊन तडजोड करणाऱ्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीने स्वत:हा पुढे येऊन हिम्मत दाखवल्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघड झाला. मागच्यावर्षी ऑगस्ट २०१७ मध्ये दिल्लीच्या अमन विहारमध्ये या मुलीवर बलात्कार झाला होता. पीडित मुलीचे दोन अज्ञात व्यक्तिंनी अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणातील एक आरोपी जामिनावर सुटून बाहेर आल्यानंतर त्याने पीडित मुलीच्या आई-वडिलांशी संपर्क साधला.

कोर्टात साक्ष फिरवण्यासाठी त्याने पीडित मुलीच्या आई-वडिलांना २० लाखाची ऑफर दिली. तुम्ही मुलीची समजूत घालून कोर्टामध्ये साक्ष फिरवण्यासाठी तिला राजी केले तर २० लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. या प्रकरणातील जामिनावर बाहेर आलेला आरोपी सुनील शाहीने ८ एप्रिलला मुलीच्या आई-वडिलांशी संपर्क साधला. आपल्या आई-वडिलांनी एकदाही ऑफर धुडकावून लावली नाही. उलट त्यांनी अॅडव्हान्स रक्कम मागितली.

शाही जेव्हा या मुलीच्या आई-वडिलांना भेटला तेव्हा ती तिच्या रुममध्ये होती. तिने हे सर्व बोलणे ऐकले. शाही तिथून निघून गेल्यानंतर ती बाहेर आली व तिने आई-वडिलांना जाब विचारला. त्यावर ते साक्ष फिरवण्यासाठी मुलीची मनधरणी करु लागले. मी तक्रार मागे घेण्यास नकार दिला पण माझे आई-वडिल माझी समजूत काढत होते. मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याने त्यांनी मला मारहाण सुद्धा केली. त्यानंतर गरीबीचे कारण देऊन मला भावनिक ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान एका व्यक्तिने आमच्या घरी पाच लाख रुपये आणून दिले. माझ्या आई-वडिलांनी ते पैस घरात ठेवले व ते कोर्टात जाण्यासाठी बाहेर पडले. त्यानंतर या मुलीने पैशांची ती बॅग उचलली व थेट अमन विहार पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली असून वडिल फरार झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nine − three =