चौफेर न्यूज – पंजाबमधील लुधियाना येथील पाच वर्षांच्या मुलाच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. मोठ्या बहिणीनेच त्या चिमुरड्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून लहान भावाच्या त्रासापासून सुटका मिळावी, यासाठीच त्याची हत्या केली, अशी कबूली तरुणीने दिली आहे.

लुधियानातील अंश कनोजिया (वय ५) या मुलाचा मृतदेह घराजवळील निर्जनस्थळी एका बॅगेत सापडला होता. कनोजिया कुटुंब हे अमरजित कॉलनीत राहतात. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता धक्कादायक गोष्ट समोर आली.

अंशची मोठी बहीण रेणूनेच (वय १९) त्याची हत्या केल्याचे उघड झाले. शनिवारी आई-वडील बाहेर गेल्यानंतर रेणूने अंशची हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह एका बॅगेत टाकला. आईवडील घरी परतल्यावर तिने अंश बेपत्ता झाल्याचा कांगावा केला. रविवारी पहाटे चार वाजता ती उठली आणि तिने अंशचा मृतदेह ज्या बॅगेत होता ती बॅग घराजवळील निर्जनस्थळी फेकली. हत्येनंतर काही तास अंशचा मृतदेह रेणूच्याच खोलीत होता.

“भावामुळे मला माझी ‘स्पेस’ मिळत नव्हती. भाऊ सारखा आईवडिलांकडे माझ्याविरोधात तक्रार करायचा. या त्रासाला कंटाळून रागाच्या भरात त्याची हत्या केली”, असे तरुणीने पोलिसांना सांगितले. पोलीस उपायुक्त राजवीरसिंग बोपराय यांनी ही माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 − 3 =