चौफेर न्यूजबायकोवर पाळत ठेवण्यासाठी पुण्यातील एका उच्चशिक्षित व्यक्तीने बेडरुममध्ये चक्क छुपा कॅमेरा लावला होता. पत्नीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांत पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. पुण्यामध्ये ही घटना घडली आहे.

वानवडी पोलिसांच्या माहितीनुसार, पत्नीवर पाळत ठेवण्यासाठी पतीने 22 ते 26 जानेवारीदरम्यान बेडरुममध्ये छुपा कॅमेरा बसवला होता. साफसफाई करताना हा कॅमेरा तिच्या हाती लागला होता. यात घरातील सर्व दृश्ये चित्रित झाली होती. त्यानंतर पीडितेने पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विदेशातून परतल्यानंतर आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. यावरून त्यांच्यात सतत भांडणे होऊ लागली. तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करू लागला, अशी माहिती पोलिसांनी दिली.  या दाम्पत्याला 12 वर्षांचा मुलगा आहे. विदेशातून परतल्यानंतर आठ महिने ते एकत्र राहिले. पण संशयामुळं त्यांच्यात वाद होऊ लागले. काही दिवसांनी आरोपी बंगळुरूमध्ये रहायला गोला. प्रत्येक शनिवारी-रविवारी मुलाला भेटण्यासाठी पुण्यात यायचा. तो पत्नीवर संशय घ्यायचा. त्यामुळे तिच्यावर नजर ठेवण्यासाठी त्याने बेडरुममध्ये कॅमेरा बसवला. हा कॅमेरा एके दिवशी तिच्या हाती लागला.  हा प्रकार पाहून संतापलेल्या पत्नीने संशयी पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून, घटनेचा तपास करण्यात येत आहे अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक रेखा काळे यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × four =