भोसरी ः ‘माझी मोठ्या राजकीय नेत्याशी ओळश आहे. तुम्हाला बांधकाम खात्यातील कामाची निविदा मिळून देतो’ असे सांगून बारामती सहकारी बॅंकेच्या मॅनेजरसह इतर 8 जणांची 72 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार भोसरी येथे नुकताच उघडकीस आला असून 2014 ते जून 2018 या  कालावधीत घडला.

विनायक नरेंद्र सुर्वे (वय-30, रा. गोकुळदास वाडी, तनपुरे चाळ, खोपट, ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बारामती सहकारी बॅकेचे भोसरी शाखेतील मॅनेजर संजय सुर्वे (वय-45, रा. पिंपळे-गुरव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांनी माहिती दिली. संजय सुर्वे हे बारामती सहकारी बॅक भोसरी शाखेमध्ये मॅनेजर आहेत. सुर्वे यांचा आरोपी विनायक हा पुतण्या आहे. तो राज्य सरकारच्या बांधकाम खात्यातील विकास कामाच्या निविदा भरून कामे करतो. फिर्यादी संजय सुर्वे यांना व त्यांच्या 8 सहकाऱ्यांना ‘माझी मोठ्या राजकीय नेत्याशी ओळश आहे. तुम्हाला बांधकाम खात्यातील कामाची निविदा मिळून देतो’ असे सांगून 72 लाख 25 हजार रूपये वेळोवेळी घेतले. मात्र, काम न देता आर्थिक फसवणूक केली. फौजदार काळूराम लांडगे अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 − 18 =