आंतरमहाविद्यालयीन युवोत्‍सव-2017 मध्ये 16 संघांचा सहभाग

पिंपरी (दि. 13 फेब्रुवारी 2017) – बास्केटबॉलच्या अतितटीच्या अंतिम सामन्यात पुण्यातील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड आंत्रेपेनरशिप डेव्हलप्मेंट महाविद्यालयाने ताथवडे येथील इंदिरा कॉलेजचा संघावर विजय मिळवला.
निगडी येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्‍ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयात तीन दिवसीय ‘युवोत्‍सव – 2017’ या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्‌घाटन डॉ. अरविंद बी. तेलंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील यांच्या हस्‍ते करण्यात आले. या स्पर्धेत पुणे जिल्‍हयातील 16 संघ सहभागी झाले होते. सर्व विजेत्‍या संघास आणि सर्वोकृष्ट खेळाडुंना महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ यांच्या हस्ते रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्‍टचे विश्वस्त भाईजान काझी, संचालक डॉ. डॅनियल पेणकर, डॉ. हंसराज थोरात आदी उपस्थित होते.
प्रथम क्रमांक विजेता संघ – इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड आंत्रेपेनरशिप डेव्हलप्मेंट महाविद्यालय, पुणे, व्दितीय क्रमांक – इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, ताथवडे, बेस्ट शूटर – निखिल पाटील, बेस्ट डिफेंडर – प्रतिक कंग्राळकर, बेस्ट प्रॉमिसिंग प्लेयर – सौरभ बोरा. स्पर्धेचे संयोजन प्रा. अमरीश पद्मा आणि प्रा. काजल माहेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, आजी-माजी विद्यार्थ्यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × 5 =