चौफेर न्यूज – बिजलीनगर  येथील शिवनागरी कॉलनी परिसरात युवा राजपूत प्रतिष्ठान यांच्या वतीने रविवारी महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे उदघाटन प्रा. जयपालसिह  गिरासे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाले. यावेळी, विद्यमान नगरसेवक नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, माजी नगरसेविका आशा सूर्यवंशी , महिला पदाधिकारी नीता परदेशी , आबासाहेब राजपूत, कोमल राजपूत, राजेंद्र गिरासे, उमेश गिरासे, प्रवीण गिरासे, प्रेमसिह गिरासे, केवलसिह गिरासे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब पाटील, भगवान निकम , भाजयुमो शहर सचिव प्रदीप पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, महाराणा प्रताप यांच्या जीवन कार्याविषयी व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. यामध्ये, मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. महाराणा प्रताप यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांनी कुठल्याही परकीय सत्तेला देशात फिरकू दिले नाही. आजच्या तरुणांनी त्यांच्या कार्याविषयी अभ्यास करून त्यांचे विचार आचरणात आणावेत, असे मत नगरसेवक ढाके यांनी व्यक्त केले.

तत्पूर्वी, सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी, महिला मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रसंगी, शिवनगरी प्रतिष्ठाण, महाराणा प्रताप मित्र मंडळ, सरदार वल्लभ भाई युवा मंच, तुळजा भवानी देवस्थान ट्रष्ट व ओंकार गणेश मंडळ यांनी मिरवणुकीचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठाणचे अध्यक्ष किशोरकुमार राजपूत यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

six + 13 =