चौफेर न्यूज – बीड जिल्ह्याने स्त्री भ्रूणहत्येचा कलंक पुसून नाव कमावले असून बीडमध्ये स्त्री जन्माचे स्वागत करा, बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत एकाच वेळी तब्बल ३०६ मुलींच्या नामकरणाचा सोहळा पार पडला. हा उपक्रम स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या १४ व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात राजयोग फाउंडेशन व कुटे ग्रुप फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. विशेष म्हणजे ३०१ मुलींची नावनोंदणी झालेली असताना ऐनवेळी एकूण ३०६ मुलींचे नामकरण झाले. या मुलींचा जन्म १५ ऑक्टोबर २०१७ ते १ जानेवारी २०१८ या कालावधीत झालेला आहे.

सजवलेला भव्य मंडप, ३०१ पाळणे, बारशाची गीते अशा उत्साहात ३०१ मुलींच्या आत्यांनी कानात कुर्रर्रर्र करत बारसे केले. कीर्तन महोत्सवाचा समारोप अशा अनोख्या पद्धतीने झाला. गतवर्षी सोहळ्यात १०१ मुलींचे सामूहिक नामकरण केले होते. पुढील वर्षी ५०१ मुलींचेनामकरण करण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. पाळणा, कपडे, खेळणी,चांदीचे वाळे मुलींना भेट देण्यात आले. आईंना साडीचोळीचा आहेर व फेटा बांधून हळदी-कुंकू करत स्वागत झाले. लंडनच्या ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने सोहळ्याची नोंद घेतली. ‘मुलींचा असा सामूहिक नामकरण सोहळा जगात कुठेही झालेला नाही, असे कौतुक समन्वयकांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve − six =