पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलच्या क्रीडा स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपळनेर : लिंबू चमचा, बुक बॅलेन्स, शंभर मीटर धावणे, संचलन, संगीत खूर्ची आदी खेळांचा पूर्व प्राथमिक आणि पहिलीच्या विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. पिंपळनेर येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूल येथे वार्षिक  क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अ. मा. पाटील महाविद्यालयाचे शिक्षक आणि अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष ए. बी. मराठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी पहिलीच्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देऊन स्वागत केले. मानवंदनेसाठी पहिलीचा विद्यार्थी प्रणव भदाणे याने लिडिंग केले. तद्नंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य मोहन गावित यांनी केले. याप्रसंगी स्कूलचे व्यवस्थापक राहुल अहिरे उपस्थित होते.

अनिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सरस्वती पूजन आणि क्रीडांगण पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे ए. बी. मराठे यांनी मुलांना खेळाचे महवत्त्व पटवून सांगितले. पूर्व प्राथमिक आणि पहिलीच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलीत करण्यात आली. पहिलीचा विद्यार्थी प्रणव भदाणे याने खेळाच्या मैदानाला क्रीडाज्योत घेऊन फेरी मारली. प्रमुख पाहुण्यांनी हिरवा झेंडा दाखवून खेळांना सुरुवात केली. त्यात 100 मीटर धावणे, लिंबू चमचा, बुक बॅलेन्स, संगीत खुर्ची, इत्यादी खेळ घेण्यात आले. स्पर्धांचे परीक्षण पूनम तवर यांनी केले. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कृशाली भदाणे यांनी आभार मानले. कार्यक्रमसाठी अहिरराव, माधुरी सैदाणे, निलीमा देसले यांनी सहकार्य केले. संगीता कोठावदे व जयेश घरटे यांनी मदत केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seven + 19 =