चौफेर न्यूज – ‘बुलेट ट्रेनमुळे ‘मेक इन इंडिया’ला चालना मिळणार आहे. या प्रकल्पासाठी तंत्रज्ञान भलेही जपानमधून येणार असेल पण सुटे भाग आणि उत्पादन मात्र भारतातच होणार आहेत,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. अॅबे यांनी आपल्या भाषणात भारत-जपान मैत्रीचे महत्व विशद केले. ते म्हणाले, ‘मजबूत भारत जपानसाठी चांगला आहे आणि मजबूत जपान भारतासाठी चांगला आहे.

आपण एकत्र काम केले तर काहीच अशक्य नाही. भारत-जपान भागीदारी विशेष आणि जागतिक आहे. भारतात उत्पादनाला चालना देण्यासाठी जपान कटिबद्ध आहे. येत्या काही वर्षांत मी भारतात येईन तेव्हा बुलेट ट्रेनच्या खिडकीतून भारताचे सौंदर्य पाहू शकेन, अशी मला आशा आहे.’

बुलेट ट्रेनची मूळ संकल्पना अहमदाबाद-मुंबई-पुणे व्हाया ठाणे अशी होती. ती बदलून मोदींनी केवळ ‘अहमदाबाद-मुंबई’ असाच मार्ग निश्चित केला, असा आरोप करत, मोदींची ही ‘निवडणूक’ बुलेट ट्रेन असून त्यातून दररोज १ लाख लोकांनी प्रवास केला तरच ती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरू शकेल, असा दावा माजी रेल्वेमंत्री आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी केला.

३९ महिन्यांच्या कालापव्ययानंतर निवडणूक येत असल्यामुळे मुंबईऐवजी अहमदाबादची भूम‌पिूजनासाठी निवड केली आहे. १ लाख १० हजार कोटींच्या बुलेट ट्रेन प्रकल्पात ६० हजार कोटी रुपये भूसंपादनावर खर्च केले जाणार असून ४० हजार कोटी रेल्वेमार्गासाठी खर्च होणार आहेत. जोपर्यंत भूसंपादन होत नाही, तोपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार नसून पूर्णत्वाला जाईपर्यंत या प्रकल्पाची किंमत २० ते ३० हजार कोटींनी वाढण्याची भीती खरगे यांनी व्यक्त केली. गुजराती लोक अतिशय व्यवहारी असतात. ते केवळ ७० मिनिटांत २००० रुपयांमध्ये अहमदाबादहून मुंबईला विमानाने जाऊ शकतात. अशा स्थितीत हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य ठरणार असल्याची टीका खरगे यांनी केली. जपानचे पंतप्रधान आणि दिलदार मित्र शिंजो आबे यांच्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एकदशांश टक्के व्याजदराने ८८ हजार कोटींचे कर्ज मिळाले, असा दावा पंतप्रधान मोदी करीत आहेत. पण कोणताही मित्र अकारण आर्थिक औदार्य दाखवत नाही. बुलेट ट्रेनच्या डब्यांचे आणि रुळांचे उत्पादन हाच मित्र करणार आहे. त्यांचा उत्पादन खर्च किती आणि त्यात किती दलाली दिली जाणार आहे हे कोणाला ठाऊक आहे, असा सवाल खरगे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four + twenty =