चौफेर न्यूज – बोपखेल येथे हरि ओम ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने निराधार, विधवा महिला, अपंग व जेष्ठ नागरिकांसाठी शिबीर मोहीम राबविण्यात आली. संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष नितीन घोलप यांनी बोपखेल येथील नागरिकरांना योजने संदर्भात मार्गदर्शन केले व त्यासाठी लागणारे कागदपत्रांबद्दल माहिती सांगितली. या कार्यक्रमास नगरसेविका हिराबाई घुले, माजी सभापती चेतन घुले, प्रतिक्षा घुले, अध्यक्ष नामदेव गोगावले, लक्ष्मण आबू घुले, नारायण काळे, गोपीनाथ शिवराम घुले, मारूती झपके, बाळकृष्ण गवळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन दक्षता समिती सदस्य रवि कोवे यांनी केले तर सूत्रसंचालन पाटीलबुवा घुले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

12 − six =