रावेत ः रावेत येथील रेल्वे ट्रॅकजवळ डोक्यात दगड घालून झालेल्या इसमाची ओळख पटली आहे. तपासात भंगार गोळा करण्याच्या वादातून मित्रानेच त्या इसमाचा खून केल्याचे समोर आले आहे. हा उलगडा गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने केला. दीपक थापा (वय 45) असे खून झालेल्याचे इसमाचे नाव आहे. याप्रकरणी सत्यजित उर्फ सुरज गुलाबचंद पांडे (वय 26, रा.आकुर्डी) याला अटक करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 27) सकाळच्या सुमारास रावेत येथील रेल्वेट्रॅकजवळ एका इसमाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याच्या अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. तपासादरम्यान तो फिरस्ता असून त्याच्या साथीदारानेच त्याचा खून केल्याचे समोर आले. तसेच हा साथीदार आकुर्डी गुरुद्वारा चौकात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीसांना मिळाली. यावर पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून पांडे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता भंगार गोळा करण्याच्या वादातून त्याने दीपक याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुल केले. पोलिसांनी सत्यजितला अटक केली. तसेच त्याला पुढील कारवाईसाठी देहूरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 + 15 =