तातडीने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची थेरगाव सोशल फाऊंडेशनची मागणी

पिंंपरी :- थेरगाव मधील दत्तनगर परीसरामध्ये भटक्या कुत्र्यांनी खूप दहशत माजवलीय आहे. काल दि.२० रोजी भरदिवसा ८ वर्षीय मुलावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. वेदांत कदम असं या मुलाचं नाव आहे. चिंचवडमधील तालेरा रूग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले असून या भटक्या कुत्र्यांचा महापालिकेने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

काल दि.२० रोजी भरदिवसा दत्तनगरमधील ८ वर्षीय वेदांत कदम या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात २ कुत्रे अक्षरक्ष: त्या लहान मुलाला ओढुन नेत होते. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या हाताला तसेच पोटाला गंभीर जखमा झाल्या आहेत. थेरगाव सोशल फाऊंडेशनचे सदस्य मुसावीर सोंडे यांनी त्या मुलाला त्वरीत चिंचवड येथील तालेरा रुग्णालयात दाखल केले. तसेच राहुल सरवदे यांनी त्वरीत पशुवैदयकिय अधिकारी यांच्याकडे तक्रार करूण त्यांना डाॅग व्हॅन पाठविण्यास सांगितले. आज (दि.२१) सकाळपासूनच थेरगाव सोशल फाऊंडेशनचे सभासद युवराज पाटील, मुसावीर सोंडे, महेश येळवंडे व डाॅग व्हॅनचे कर्मचारी यांनी कुत्रांचा शोध घेऊन २ कुत्रे पकडण्यात यश आले. तरी अद्यापही परिसरात अनेक भटकी कुत्रे मोकाट असून तात्काळ त्यांना पकडण्यात यावे अशी मागणी थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen − 9 =