चिंचवड ः मित्राचे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्ती करणार्‍या एकावर कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना रविवारी (दि.19) रात्री अकराच्या सुमारास थेरगाव जयभवानीनगर येथील अमृता फ्रेश मार्केटसमोर घडली. पंकजधंनु सिंग असे कोयत्याचे वार होऊन जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी रुपेश विजय सुर्यवंशी (वय 18, रा. थेरगाव) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोन्या उर्फ प्रशांत सतिश सोनवणे, अविनाश मुरकुटे, कृष्णा गडहिरे, आशपा शेख आणि इतर दोन अनोळखी इसमांविरोधात (सर्व रा. विद्यानगर, आकुर्डी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री फिर्यादी रुपेश आणि आरोपींमध्ये किरकोळ कारणावरुन बाचाबाची झाली होती. यानंतर त्यांच्या भांडण सुरु झाले. हे भांडण सोडवण्यासाठी रुपेश याचा मित्र पंकजधंनु सिंग याने मद्यस्ती करुन भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी अविनाश मुरकुटे यांनी पंकजधंनु याच्या हातावर कोयत्याने वार करुन जखमी केले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक भोगम तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen + three =